Electric Shock  (file photo)
नाशिक

Boy Dies of Electric Shock | विजेचा धक्का लागून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

Boy Dies of Electric Shock | वीज कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील गुलशन जैनब, तहजीब हायस्कूलजवळ शुक्रवारी (दि.२६) विजेच्या खांबात वीजप्रवाह उतरल्याने १३ वर्षीय मोहम्मद मुजम्मिल मोहम्मद आसिफ या मुलाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुजम्मिल हा सायंकाळी मगरीबची नमाज अदा करून घरी परतला होता. घराच्या गच्चीवर जाण्यासाठी तो लोखंडी शिडीचा वापर करत असताना त्याचा हात घरासमोरील वीज खांबाला लागला. संबंधित खांबात वीज प्रवाहित असल्याने त्याला जोरदार धक्का बसला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक डॉ. खालिद परवेज, सामाजिक कार्यकर्ते शफीक अँटी करप्शन यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक डॉ. परवेज यांनी सांगितले की, मृत मुलाच्या घरासमोरील रस्ता अत्यंत खराब असून, पावसाचे पाणी साचले होते.

अशा परिस्थितीत लोखंडी शिडीच्या साहाय्याने घरावर चढताना मुलाचा हात वीज खांबाला लागल्याने हा अपघात घडला. सामाजिक कार्यकर्ते शफीक यांनी शहरातील धोकादायक वीज खांब, तारा आणि इतर विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्तीची मागणी केली.

महिनाभरात विजेमुळे सहा मृत्यू

महिनाभरात मालेगाव शहरात करंट लागून मृत्यू झालेल्यांची संख्या सहापेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. वारंवार होत असलेल्या अशा दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT