ठळक मुद्दे
स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१ ए' या लढाऊ विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाइनचे आज लोकार्पण
पहिले स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१' हे लढाऊ विमान आकाशात झेपावणार
नाशिक प्रकल्पात वार्षिक आठ विमानांची निर्मितीचे ध्येय
नाशिक : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एचएएल येथे स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१ ए' या लढाऊ विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाइनचे शुक्रवारी (दि. १७) लोकार्पण होत आहे. तसेच पहिले स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१' हे लढाऊ विमानदेखील त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आकाशात झेप घेणार आहे. या सोहळ्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गुरुवारी (दि.१६) सायंकाळी ५ च्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
देशाच्या संरक्षण सामर्थ्याचे प्रतीक असलेले स्वदेशी लढाऊ विमान 'तेजस एमके-१ ए' नाशिकच्या भूमीतून आकाशात झेपावण्यास सज्ज झाले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक प्रकल्पात 'तेजस एमके-१ ए' या लढाऊ विमानाची बांधणी करण्यात आली आहे.
हवाई दलातील लढाऊ विमानांचा असमतोल दूर करण्यासाठी एचएएलने उत्पादन वाढविण्यासाठी बंगळुरूनंतर नाशिक येथे उत्पादन साखळी कार्यान्वित केली आहे. एचएएल हलक्या तेजस लढाऊ विमानांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत बंगळुरू येथे दोन, तर नाशिकमध्ये एक उत्पादन साखळीचे नियोजन केले आहे. नाशिक प्रकल्पात वार्षिक आठ विमानांची निर्मितीचे ध्येय आहे. दरम्यान, पहिल्या 'तेजस एमके-१ ए' विमानाची यापूर्वीच निर्मिती अपेक्षित होती. मात्र, इंजिन उपलब्धतेअभावी त्यास विलंब झाला आहे. असे असले तरी, पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 'तेजस एमके-१ ए' या विमानाच्या गगनभरारीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
असा आहे संरक्षणमंत्र्यांचा दौरा
गुरुवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास एचएएल विमानतळावर आगमन झाले असून सायंकाळी ७ वाजता त्यांच्या हस्ते ओझर मिनी स्मार्ट टाउनशिपचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आज शुक्रवारी (दि. १७) सकाळी ११ च्या दरम्यान त्यांच्या हस्ते 'तेजस एमके-१ ए' या लढाऊ विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाइन लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तेजस आकाशात झेपावणार आहे. तसेच एचएएल प्रकल्पात कार्यान्वित करण्यात आलेल्या एचटीटी ४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
तेजसचे विधिवत पूजन
'तेजस एमके-१ ए' या लढाऊ विमानाच्या मॅन्युफॅक्चरिंग लाइनचे तसेच विमानाचे पूजन परांपरागत पद्धतीने होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याचे पौराहित्य काळाराम मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी महंत सुधीरदास महाराज व प्रणव पुजारी यांच्याकडून केले जाणार आहे. गणपती पूजन, पंचवाक्यात्म्क पुण्ययाहवाचन, भारद्वाज ऋषिपूजन, तेजस विमानाचे पूजन आदी विधी पार पाडले जाणार आहेत. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना महावस्त्र, शाल, प्रभू रामचंद्राची प्रतिमा, पंचधातूच्या राम, लक्ष्मण, सीता दरबार फोटो, पुणेरी पगडी प्रसाद म्हणून दिला जाणार आहे.
श्रीमहंत सुधीरदास महाराज यांच्या हस्ते होणार पौरोहित्य
आज शुक्रवार ( दि. 17) ,रोजी ओझर विमानतळ भारतीय स्वबनावटीच्या तेजस विमान लढाऊ विमानाचे पुजन व राष्ट्रार्पण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या संपन्न होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य काळाराम मंदिराचे वंशंपरंपरागत पुजारी श्रीमहंत सुधीरदास महाराज व प्रणव पुजारी करणार आहे.
गणपती पूजन पंचवाक्यात्म्क पुण्ययाहवाचन भरद्वाज ऋषी पूजन तेजस विमानाचे पूजन संपन्न होणार आहे. याप्रसंगी श्री महंत सुधीर दास महाराज हे संरक्षण मंत्री यांना महा वस्त्र शाल व प्रभू रामचंद्राची प्रतिमा पंचधातूच्या राम लक्ष्मण सीता दरबार फोटो पुणेरी पगडी प्रसाद म्हणून देणार आहेत.