Nashik accused bail rejected 
नाशिक

TCS Nashik accused bail rejected |टीसीएस-संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

TCS Nashik accused bail rejected |टीसीएस-संशयितांचे जामीन अर्ज फेटाळले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी आसिफ अन्सारी, रझा मेमन, अश्विनी चेनानी यांच्यासह पाचही संशयित आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने निर्णय दिला.

शुक्रवारी (दि.१५) आसिफ अन्सारी, रझा मेमन, अश्विनी चेनानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद करत संशयिताना अटक करण्याची गरज नव्हती. त्यांची अटक बेकायदेशीर आहे. त्यांनी कोणाचेही धर्मांतरण केले नाही. त्यांना जामीन मिळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद केला.

अश्विनी चेनानी हिच्या वकिलांनी देखील युक्तिवादात कोणतीही लेखी तक्रार दिलेली नव्हती. चेनानीची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले. यावेळी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यात नोटीस दिल्यानंतरही आरोपी तपासात सहकार्य करत नव्हते. त्याप्रमाणे जर सर्व आरोपी फरार झाले असते तर प्रकरणात तपास करणे शक्य नव्हते. या कारणास्तव आरोपींना अटक करण्याची कारणे व इतर पूर्तता एसआयटीमार्फत करण्यात आली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींनी पीडितांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केले. आरोपींनी पीडितांसमोर लज्जा उत्पन्न होईल, असे वक्तव्ये केली. तरीदेखील अश्विनी चेनानी हिने पीडितांच्या तक्रारींची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आरोपींना प्रोटेक्शन मिळाले. दरम्यान, न्यायाधीश व्ही. व्ही. कठारे यांनी आरोपींविरुद्ध सक्षम पुरावा आहे. गुन्ह्याचा तपास होणे आवश्यक आहे. आरोपींना सोडल्यास साक्षीदारांवर दबाव येईल, अशा कारणांचा विचार करत जामीन अर्ज रद्द केला. यावेळी सहायक सरकारी वकील व्ही. आर. गायकवाड यांची मिसर यांना मदत मिळाली.

पीडितेने सांगितली आपबिती

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान पीडिता देखील न्यायालयात हजर होती. तिने तिच्यावर झालेले अत्याचार व इतर मुलींवर झालेले अत्याचाराबाबतची माहिती न्यायालयात दिली. आरोपींनी परिस्थितीचा फायदा घेत खूप अत्याचार केले, अशी आपबिती तिने सांगितली.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान पीडिता देखील न्यायालयात हजर होती. तिने तिच्यावर झालेले अत्याचार व इतर मुलींवर झालेले अत्याचाराबाबतची माहिती न्यायालयात दिली. आरोपींनी परिस्थितीचा फायदा घेत खूप अत्याचार केले, अशी आपबिती तिने सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT