नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. 'केसरकरांच्या प्रत्येक फोटोत दिसणारा हा माणूस नेमके काय करतो?' असा सवाल उपस्थित करत अंधारे यांनी हा माणूस नामकर्ण एकनाथ आवारे असून, 'जगदंब' पतसंस्थेचा प्रमुख आहे, स्टाइस असोसिएशनशीही त्याचा संबंध आहे.
मी जेवढी स्थानिकांकडून माहिती घेतली त्यानुसार हा व्यक्ती अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे 'ब्लॅक मनी' व्हाइट करण्याचे काम करतो, असा आरोप त्यांनी यावेळी केला. पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अंधारे यांनी रविवारी (दि. २९) पत्रकारांशी संवाद साधला. केसरकर यांनी आपल्याविरोधात कट रचला जात असल्याचे विधान केले होते, ज्याचा अंधारे यांनी समाचार घेतला.
केसरकरांचे विधान 'बालिश आणि हास्यास्पद' असल्याचे सांगत अंधारे म्हणाल्या की, 'केसरकर म्हणतात माझ्याविरोधात कट केला जात आहे, हे मला बालिश आणि हास्यास्पद वाटते. केसरकर स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासार्ह व्यक्ती मानतात आणि म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा त्यांचा दावा आहे.
'माजी मंत्री केसरकरांच्या प्रत्येक फोटोत दिसणारा हा माणूस नेमके काय करतो?' असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी हा माणूस नामकर्ण एकनाथ आवारे असून, 'जगदंब' पतसंस्थेचा प्रमुख आहे. स्टाईस असोसिएशनशीही त्याचा संबंध आहे. मी स्थानिकांकडून माहिती घेतली त्यानुसार हा व्यक्ती अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे 'ब्लॅक मनी' व्हाइट करण्याचे काम करतो, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. केसरकर यांनी आपल्याविरोधात कट रचला जात असल्याचे विधान केले होते, ज्याचा अंधारे यांनी समाचार घेतला. केसरकरांचे विधान 'बालिश आणि हास्यास्पद' असल्याचे सांगत अंधारे म्हणाल्या की, 'केसरकर म्हणतात माझ्याविरोधात कट केला जात आहे, हे मला बालिश आणि हास्यास्पद वाटते.
केसरकर स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे विश्वासार्ह व्यक्ती मानतात आणि म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, जर तुम्ही खरोखरच इतके विश्वासार्ह असता, तर आज तुम्ही मंत्रिमंडळात असता, असा टोला त्यांनी लगावला.
केसरकर म्हणतात की, माझी चौकशी का करायची? नाहीतर मी सर्वांचा भंडाफोड करेन. मी त्यांना आवाहन करते की, त्यांनी भंडाफोड करावा. जी काही ३९ नावे असतील ती समोर येऊ द्या. त्यात जे कोणी ८-९ मंत्री, पोलिस किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांची नावे जाहीर करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
'ये रिश्ता क्या कहलाता है ?'
अंधारे म्हणाल्या की, केसरकर, तुमचे काम शालेय शिक्षणमंत्री म्हणून आहे, मग हा पतसंस्थेचा माणूस तुमच्यासोबत वारंवार का दिसतो? तुमच्याकडे जर ४० लोकांची माहिती आहे आणि ती तुम्ही दडवून ठेवत असाल, तर तो गुन्हा आहे. या नामकर्ण आवारेशी तुमचे नेमके नाते काय? असा टोलाही त्यांनी लगावला.
आवारेंकडून प्रतिसाद नाही
याबाबत स्टाइस असोसिएशनचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांच्याशी दैनिक 'पुढारी'च्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र, आवारे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही.