Crop Damage Pudhari File Photo
नाशिक

Nashik Drought Crop Damag | उभी पिके वाळली ; शेतकऱ्यांना मदतीची आशा

Nashik Drought Crop Damag | दुष्काळग्रस्त दहा तालुक्यांमध्ये ५.९२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाअभावी खरीप हंगामातील उभी पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पंचनाम्यांचे काम मात्र अत्यंत मंथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. दुष्काळाच्या पहिल्या टप्प्यात ट्रिगर-१ लागू झालेल्या जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये आतापर्यंत अत्यल्प पंचनामे झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता असून, पंचनाम्यांना तातडीने गति देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील ट्रिगर-१ लागू असलेल्या १० तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ३३९ गावे, ५ लाख ९२ हजार ६१६ हेक्टर पेरणी क्षेत्र आणि ५ लाख ६० हजार ९६० खातेदार आहेत. यात मागील आठवड्यात सुमारे ८ हजार ४०३ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, त्यात १० हजार १५४ खातेदारांचा समावेश आहे.

मात्र, एकूण पेरणी क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, कृषी सचिवांकडून दुष्काळी परिस्थितीतील पंचनाम्यांच्या प्रगतीचा दररोज आढावा घेतला जात असला, तरी सध्या सुरू असलेल्या पंचनाम्यांची प्रक्रिया अतिशय मंथगतीने सुरू असल्याने नाशिक जिल्ह्यात पंचनाम्यांना गति देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

विशेष म्हणजे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पंचनाम्यांचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. दुष्काळामुळे उभी पिके हातची गेल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या दुष्काळी मदतीसाठी नुकसान निश्चित करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असल्याने पंचनामे लवकर पूर्ण होने आवश्यक आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणि पंचनाम्यांचा वेग यातील तफावत दूर करून प्रशासनाने गावागावांत मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पंचनामे गती वाढीची गरज:

दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या काही तालुक्यांमध्ये पंचनाम्यांची गती अत्यंत कमी असून, इगतपुरीतील १२६ गावांपैकी बोटावर मोजण्याएवढेच पंचनामे झाले आहेत. पेठ, सुरगाणा, सिन्नर, कळवणमधील काही गावांत पंचनामे झाले असले, तरी ही प्रक्रिया अतिशय मंथगतीने सुरू आहे, तर देवळा आणि येवला तालुक्यांमध्ये तुलनेने अधिक काम झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT