Soybean pudhari photo
नाशिक

Agriculture Market | सोयाबीनला 8,200 तर मक्याला 3,005 रुपये भाव

Agriculture Market | चांदवड बाजार समितीत भुसार शेतीमाल लिलाव

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात मंगळवारी (दि. २०) भुसार शेतीमाल लिलावाचा प्रारंभ झाला। बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांच्या उपस्थितीत शेतकरी तुकाराम गोडसे यांच्या हस्ते लिलावाचा प्रारंभ झाला। पहिल्याच दिवशी सोयाबीनला ८,२०० रुपये, तर मक्याला ३,००५ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला
एकूण १,३०० क्विंटल शेतीमालाची आवक झाल्याने शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे

चांदवड बाजार समितीत विक्रीस आलेल्या मक्याला २,९११ ते ३,००५ रुपये, तर सरासरी २,३४० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला सोयाबीनला ६,१४५ ते ८,२०० रुपये, तर सरासरी ७,१०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला शेतीमालाची गुणवत्ता आणि आर्द्रतेच्या प्रमाणानुसार भाव निश्चित केले.

भुसार शेतीमालाच्या लिलावामुळे चांदवड व परिसरातील शेतकऱ्यांना मका, सोयाबीनसह इतर शेतीमाल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. बाजार समितीच्या आवारात शेतीमालाचे चोख वजनमाप करून विक्रीची रक्कम रोख स्वरूपात तत्काळ अदा केली जात असल्याने शेतकऱ्यांनी अधिकृत बाजारपेठेतच शेतीमाल विक्रीस आणावा, असे आवाहन केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, उपसभापती योगेश ढोमसे, सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे, संचालक शिरीषकुमार कोतवाल, डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. राजेंद्र ढवळे आदी उपस्थित होते

'विनापरवाना' खरेदी-विक्रीवर कारवाई

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अधिकृत परवाना नसताना कोणत्याही व्यापाऱ्याने, संस्थेने वा व्यक्तीने शेतीमालाची खरेदी करू नये। विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशारा बाजार समितीने दिला।

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT