Chandwad Police Head Constable | चांदवड येथे बंदोबस्तासाठी जाताना दुचाकी घसरून हेड कॉन्स्टेबल राजेंद्र माळी यांचा अपघातात मृत्यू

Chandwad Police Head Constable | चांदवडला बंदोबस्तासाठी जाताना घडली घटना
Pernem Crime News
Pernem Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
श्री रेणुकामाता यात्रोत्सवाच्या बंदोबस्तासाठी जाताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चांदवड पोलिस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल राजेंद्र किसन माळी (४९, मूळ रा. आराई, ता. सटाणा) यांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. १४) सकाळी साडेनावाच्या सुमारास आठवडे बाजारामधील पांचाळ वस्तीजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेने चांदवड पोलिस दलसह शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Pernem Crime News
Drought Declared Nashik | नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके अधिकृतपणे दुष्काळी घोषित

बुधवारी सकाळी पोलिस ठाण्यातून दुचाकीने (एमएच ४१ बीयू १५०४) रेणुकामाता मंदिराकडे जाताना त्यांची दुचाकी घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासाऱ्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. माळी यांच्या निधनाची बातमी समझताच त्यांच्या पत्नी व मुलाने केलेला आक्रोब पाहून उपस्थाितांचेही डोळे पाणावले. माळी हे गेल्या तीन वर्षांपासून चांदवड पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. शांत, मनमिळावू आणि हसतमुख स्वभावामुळे ते सहकारी व नागरिकांमध्ये परिचित होते. त्यांच्यावर मूळ गावी आराई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news