कुडाळ बसस्थानकात १० लाखांचे दागिने लंपास (Pudhari File Photo)
नाशिक

Sinnar Fraud News | महिलेला गंडा घालून 60 हजारांचे दागिने लंपास

Sinnar Fraud News | पाथरे बुद्रुक परिसरात दोन अनोळखी इसमांनी संगनमताने महिलेची फसवणूक करून सुमारे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

पाथरे बुद्रुक परिसरात दोन अनोळखी इसमांनी संगनमताने महिलेची फसवणूक करून सुमारे ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलजा सतीश बूब (५५, रा. पाथरे बु.) या मंगळवारी (दि. ५) सकाळी सुमारे १०.४५ वाजता श्रीराम चौक परिसरात रस्त्याकडेला असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतवले.

विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील सुमारे १.५ तोळे वजनाचे डायमंड पेंडंट असलेले सोन्याचे मंगळसूत्र (किंमत सुमारे ४५ हजार रुपये) तसेच हातातील खड्याची सोन्याची अंगठी (किंमत सुमारे १५ हजार रुपये) असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करून चोरून नेला.

आरोपींपैकी एक इसम सडपातळ बांध्याचा, वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, डोक्यावर कॅप, अंगात नारिंगी रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व निळी पॅन्ट असा होता. दुसरा इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, मजबूत बांधा, डोक्यावर कॅप, अंगात पांढरा शर्ट व काळी पॅन्ट, नेपाळी स्वरूपाचा दिसणारा असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. दोघेही मराठी भाषेत बोलत होते. पोलिस उपनिरीक्षक कोठावळे पुढील तपास करीत आहेत.

चारचाकीतून ४७ हजारांची चोरी

वावी : सिन्नर तालुक्यातील शहा परिसरात उभ्या असलेल्या फोरव्हिलर गाडीमधून ४७ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी राजेंद्र नानासाहेव बहिरट (३८, रा. शहा) यांनी आपली फोरव्हिलर गाडी भैरवनाथ हायस्कूलसमोरील कमानीजवळ उभी केली होती. २१ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गाडीच्या पुढील सीटवर टोपीखाली ठेवलेली ४७ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. हवालदार कोळपे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT