Simhastha Kumbh Mela  
नाशिक

Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालना निमंत्रण

Simhastha Kumbh Mela | कुंभमेलामंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे दि. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण कुंभमेलामंत्री तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना दिले.

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीची तसेच या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याच्या नियोजनाची माहिती राज्‍यपालांना दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची महत्त्पूर्ण केंद्र असून, सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा महत्त्वाचा उत्सव आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून देशबरातील संत - महंत, साधू आणि भाविकांच्या श्रद्धेला एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन भव्य, दिव्य, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांची सोय आणि विविध प्रशासकीय व्यवस्थांच्या नियोजनावर भर देण्यात येत असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी यावेळी दिली.

यापूर्वीकील सन २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात मंत्री म्हणून केलेले नियोजन आणि सुरक्षित कुंभ कशा पद्धतीने पार पाडला व यशस्वी नियोजन करण्यात आले होते याबद्दलही माहिती मंत्री महाजन यांनी राज्‍यपालांना दिली. या भेटीप्रसंगी राज्‍यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि राजभवन कार्यालयाचे प्रबंधक निशिकांत देशपांडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT