Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यातून घडणार 'नवे नाशिक'; पुढील 40 वर्षांचा आराखडा तयार!

Nashik Simhastha Kumbh Mela | मंत्री गिरीश महाजन : 40 वर्षांची गरज लक्षात घेऊन नियोजन ; केंद्र - राज्याकडून भरीव निधी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांमुळे शहराचा सर्वांगीण कायापालट होणार आहे. केवळ सिंहस्थ कुंभमेळ्यापुरती तात्पुरती व्यवस्था न करता, पुढील ४० वर्षांची गरज लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून नाशिकच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून, या माध्यमातून 'नवे नाशिक' घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे सिंहस्थ कुंभमेळा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. बारदान फाटा ते त्र्यंबक रोड या २४ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामाला रविवारी (दि. २०) महाजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला. सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी ६६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक पायाभूत सुविधांना गती देण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक पर्व नसून, शहराच्या विकासाची मोठी संधी आहे. कुंभमेळ्यानंतरही नाशिककरांना या सुविधांचा दीर्घकाळ लाभ मिळावा, यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मलनिस्सारण, आरोग्य, पार्किंग, नदी संवर्धन आणि सार्वजनिक सुविधांचे दीर्घकालीन नियोजन केले जात आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

24 मीटर रस्ता ठरणार महत्त्वाचा दुवा

बारदान फाटा ते त्र्यंबक रोड रस्त्याच्या रुंदीकरणामुळे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची वाहतूक अधिक सुरक्षित होणार आहे. रिंग रोड, दर्शनपथ, विमानतळ विस्तार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, नदी संवर्धन आणि साधुग्रामसह विविध कामांनाही गती देण्यात आली आहे.

स्वच्छ, सुंदर, हरित आणि आधुनिक नाशिक घडविण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून विकास साधण्याचा प्रयत्न असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले. यावेळी आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT