सिडको : तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकीचा नादुरुस्त पाईपची पहाणी करायला गेले असता त्यांचा तोल जाऊन खाली पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
राजेंद्र सुरेश जाधव ( वय ५७ ) राहणार माणिक हाईटस. शिवपुरी चौक. उत्तमनगर सिडको. माणिक हाईटस या अपार्टमेंट मध्ये राहत असून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या पाण्याची टाकीचा पाईप नादुरुस्त झाल्याने राजेंद्र जाधव हे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर जाऊन पाण्याची टाकीची पाहणी करत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावर खाली कोसळले. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत राजेंद्र जाधव यांचे माणिक हाईटस इमारती मध्ये मेडिकल दुकान आहे त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरू आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली करीत आहेत .