नाशिक : ओझर येथे शुक्ल यजुर्वेद मूळसंहिता एकाकी कंठस्थ पाठ पारायण विधान सोहळ्यात सहभागी वैदिक विद्यार्थी.  Pudhari News Network
नाशिक

Shukla Yajurveda : बालवयात संपूर्ण शुक्लयजुर्वेद कंठस्थ; तिघा वेदकुमारांचा नवा विक्रम!

नाशिकच्या पुण्य भूमीत 'वेदब्रह्मघोष'

पुढारी वृत्तसेवा

Shukla Yajurveda original codex recitation ceremony

ओझर (नाशिक) : तो क्षण होता अलौकिक, तो क्षण होता दैवी! जेव्हा पवित्र ओझर नगरीचा आसमंत केवळ वेदघोषानेच नव्हे, तर एका अभूतपूर्व मानवी साधनेच्या तेजाने उजळून निघाला. निमित्त होते महापंडित धनंजयभट्ट जोशी गुरुजी (घनपाठी) यांच्या श्रीगुरुजी वेद विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'शुक्ल यजुर्वेद मूळसंहिता एकाकी कंठस्थ पाठ पारायण विधान' सोहळ्याचे! या ज्ञानयज्ञात तीन बाल तपस्वींनी संपूर्ण शुक्लयजुर्वेद संहिता कंठस्थ म्हणून एक असाधारण विक्रम दक्षिण काशी म्हणजेच नाशिकमधून आपल्या नावे केला.

नुकत्याच काशीच्या पुण्यभूमीत संपन्न झालेल्या 'दंड क्रम विधाना'च्या धर्तीवर आयोजित या सोहळ्याने संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले. या पारायण सोहळ्यात देशभरातून शेकडो वैदिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यात वेदांत निसाळ, सोहम चोपडे, आणि शिव पाण्ड्या! या वेदकुमारांनी आपल्या अद्भुत स्मरणशक्ती, अविचल श्रद्धा आणि कठोर साधनेच्या बळावर संपूर्ण शुक्ल यजुर्वेद संहिता, एकही चूक न करता, मुखोद्गत सादर केली. त्यांचा स्वरबद्ध, लयबद्ध, शुद्ध आणि तेजस्वी वेदपाठ ऐकताना उपस्थित जनसमुदाय अक्षरशः भारावून गेला होता.

वेद अध्ययन करणारा विद्यार्थी असामान्य

या ऐतिहासिक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शुक्ल यजुर्वेदाचे अभ्यासक श्रीमहंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांची उपस्थिती लाभली. ‘वेदः शिवः शिवो वेदः। वेदाध्यायी सदा शिवः।।’ या श्लोकाचा अर्थ उलगडताना त्यांनी ‘जो वेदांचे अध्ययन करतो, तो विद्यार्थी सामान्य नसतो, तो साक्षात शिवस्वरूप असतो असे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने धर्मशास्त्र अभ्यासक, वैदिक परंपरेचे उपासक आणि नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT