येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे pudhari news network
नाशिक

Shivsrushti Nashik | येवल्यात साडेचार एकरावर साकारली शिवसृष्टी; येत्या रविवारी स्वागत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुमारे साडेचार एकर जागेत २१ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ११ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण गुरुवारी (दि. २६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत असून, मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती, तर मंत्री छगन भुजबळ अध्यक्षस्थानी राहणार आहेत. (A grand Shiva Srishti project based on the concept of Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj is being implemented in Yevla city)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रविवार दि. २२ रोजी येवला शहरात (ShivSrishti Projects in yeola) जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले आहे. या शिवसृष्टी प्रकल्पात शिवरायांचा १२ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती सिंहासनाधिष्ठित पुतळा, महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांचे भित्तिचित्रे व शिल्प, शिवकालीन शस्त्रास्त्रांचे आणि पुस्तकांचे प्रदर्शन, शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल हॉल, किल्ल्यांच्या प्रतिकृती असलेले मुख्य प्रवेशद्वार, सुरेख गार्डन आणि नयनरम्य कारंजे यासह विविध कामांचा समावेश आहे.

अंगणगाव ते शिवसृष्टी दरम्यान मिरवणूक

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे आगमन होणार आहे. या ठिकाणाहून पुतळ्याचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर विंचूर, हनुमाननगर, भरवस फाटा, देशमाने, जळगाव नेऊर, एरंडगाव, अंगणगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता अंगणगाव ते शिवसृष्टी येथे मिरवणूक काढण्यात येऊन शिवसृष्टी प्रकल्पात पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT