Minister Chhagan Bhujbal / मंत्री छगन भुजबळ Pudhari File Photo
नाशिक

Chhagan Bhujbal | शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत

Chhagan Bhujbal | भुजबळ : संजय राऊत यांच्या दाव्याची उडविली खिल्ली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत, तसे होणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

सीमाभागातील लढ्यासंदर्भातील बैठकीसाठी शरद पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात गेले होते. जवळचे कार्यालय असल्याने ते तेथे गेले, त्याचा अर्थ ते एनडीएसोबत जात आहेत असा होत नाही, असे सांगत भुजबळ यांनी खा. संजय राऊत यांच्या दाव्याची खिल्ली उडविली. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री भुजबळ म्हणाले, 'शरद पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी कार्यालयात त्यांचे सन्मानाने स्वागत केले जाते. त्यासाठी लाल कार्पेट अंथरले जाते.

अशा भेटींचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही.' यावेळी त्यांनी खा. राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या दाव्यावरही टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, या दाव्याची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, 'मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मला त्याबाबत माहिती नाही.

पूर्वी काँग्रेसमधील एक नेतेही ज्योतिषाच्या आधारावर स्वतः मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत होते; मात्र, पुढे ते पक्षाध्यक्षही राहिले नाहीत.' संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना भुजबळ यांनी, 'राऊतांनी पंचांग पाहून हे सांगितले की, परिस्थितीचा कानोसा घेऊन, हेच समजत नाही,' असा उपरोधिक टोला लगावत त्यांच्या दाव्याची खिल्ली उडवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT