नाशिक

Nashik Hi-Tech Copy : कृषी विभागाच्या परीक्षेतील हायटेक कॉपी प्रकरणी इतर संशयितांचा शोध

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कृषी विभागाच्या परीक्षेत शुक्रवारी (दि. २२) हायटेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरून कॉपी करणाऱ्यास म्हसरूळ पोलिसांनी पकडले आहे. त्यास न्यायालयाने सोमवार (दि. २५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, या गुन्ह्यात संशयितास मदत करणाऱ्या इतरांचा शोध म्हसरूळ पोलिस घेत आहेत. (Nashik Hi-Tech Copy)

सूरज विठ्ठलसिंग जारवाल (२३, रा. जारवालवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २२) कृषी विभागातील विविध पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. म्हसरूळ येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील पुणे विद्यार्थिगृह येथील परीक्षा केंद्रात दुपारी ऑनलाइन परीक्षा सुरू होती. परीक्षा सुरू होण्याआठी परीक्षा केंद्रात जाणाऱ्या परीक्षार्थींची तपासणी सुरू असताना तेथील सुरक्षारक्षकांना सूरज जारवाल याचा संशय आला. सूरजची तपासणी केली असता त्याच्याजवळ मोबाइल, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असे साहित्य त्याच्या सँडलच्या तळाखाली आढळून आले. तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लपविण्यासाठी एक सँडो बनियनच्या आतील बाजूस पाकीट व फोटो काढण्यासाठी पाकिटाला छिद्र असल्याचे आढळून आले. मोबाइलमध्ये कॉपी करण्यासाठी हायटेक हिडन सॉफ्टवेअर मिळून आले. त्यामुळे तपास करून सूरजविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात फसवणुकीसह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. (Nashik Hi-Tech Copy)

तपासात सूरजला मदत करण्यासाठी इतर कोण संशयित आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच याआधी तलाठी भरती प्रक्रियेसाठी राबवलेल्या परीक्षेत कॉपी करताना पकडलेल्या संशयितांसोबत सूरज जारवालचे काही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT