Nashik Crime News
सातपूर (नाशिक): नाशिकमध्ये बेंचवर बसण्यावरून झालेल्या वादात 16 वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याची घटना शनिवारी संध्याकाली घडली. यशराज गांगुर्डे (16, पवार संकुल, अशोकनगर) असे या मुलाचे नाव असून तो एका खासगी विद्यालयात 10 वी इयत्तेत शिकत होता.
यशराज हा शनिवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी आपल्या मित्रासोबत अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीजवळ गार्डन जवळ असलेल्या खासगी शिकवणी वर्गाकडे जात होता. यादरम्यान तिथे दोन मुलं आली आणि यशराजला लाथा-गुद्द्यांनी मारहाण केली. यशराज आणि त्या मुलांमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद झाला होता आणि हाच वाद मारहाणीपर्यंत पोहोचला.
यशराजचा क्लासमधील दोन विद्यार्थ्यांसोबत वाद झाला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने यशराजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार आहे.यशराज वडील यांनी देखील कोरोनो काळात कर्जबाजरी झाल्याने काही वर्षा पूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मोठा भाऊ शाळेत स्कुलवाहन चालक असून विद्यार्थी पोहचवण्या काम करतो. या प्रकरणाचा अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.