Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातला सात दिवस पोलिस कोठडी, समता पतसंस्था घोटाळ्यात न्यायालयाचा दणका

Ashok Kharat Case | तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याची सरकारी पक्षाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

समता नागरी सहकारी पतसंस्थेत कथित बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या मुख्य आरोपी अशोक उर्फ भोंदू खरात याला राहाता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत सरकारी पक्षाने १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली.

राहाता पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात समता पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या नावावर तब्बल १०० बनावट खाती उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या अनेक खात्यांत अशोक खरात हा नॉमिनी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना आरोपीने कागदपत्रांचा वापर करत फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे सांगितले. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध, आर्थिक व्यवहारांची साखळी, संबंधित कागदपत्रांचे मूळ स्रोत आणि व्यवहारांचा तपशील उघड करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे नमूद केले.

दरम्यान, बचाव पक्षाने खातेदारांकडून कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याचा युक्तिवाद केला. आर्थिक नुकसान झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. आरोपीने संबंधित कागदपत्रांचा वापर करत कर्ज घेतल्याचेही सिद्ध झाले नसल्याचा दावा बचाव पक्षाकडून न्यायालयात करण्यात आला.

मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राहाता पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT