नाशिक

Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर रामकुंड आणि गांधी तलाव झाले चकाचक; घाटांची कामे अंतिम टप्प्यात

Simhastha Kumbh Mela | ध्वजारोहणाचे काऊंटडाउन : घाटाची डागडुजी, सपाटीकरणाची कामे पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासाठी रामकुंड आणि गांधी तलाव चकाचक करण्यात आला आहे. घाटाची डागडुजी आणि मुरूम टाकून सपाटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, आता प्रशासनाकडून सुशोभिकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

तर दुतोंड्या मारुतीलगतच्या पुलाखालील भागातील प्रंचड राडारोडा असल्यामुळे एकीकडे स्वच्छता, तर दुसरीकडे दुर्गंधी असेही सध्या बघावयास मिळत आहे. ध्वजारोहणापासून नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ होत असून, ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, ध्वजारोहणाला अवघे १३ दिवस शिल्लक असताना, अजूनही रामकुंड अणि गोदाघाटावरील कामे सुरू सुुरुच आहेत. ध्वजारोहणासाठी रामकुंडची कामे पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे ठाकल्यानांतर, प्रशासनाने किमान ध्वजारोहणाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देत नव्या घाटासह रामकुंड अणि गांधी तलावाचा काही भागांत कायापालट केला आहे.

रामकुंडची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी दि. १२ ऑक्टोबर रोजी प्रशासनाने, दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत माविकांसाठी रामकुंड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, रामकुंडची कामे बऱ्यापैकी पूर्ण केल्यामुळे आता प्रशासनाकडून सुशोभिकरणावर भर दिला जात आहे.

ठळक घडामोडी व वैशिष्ट्ये:

  • दोन्ही ध्वजस्तंभांची उभारणी पूर्ण; गोदाघाट परिसर अतिक्रमणमुक्त.

  • दुतोंड्या मारुतिलगत घाटाचे काम पूर्ण.

  • रामकुंडातील राडारोडा उचलला.

  • फरशी, काँक्रिटीकरण आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून घाई.

  • रामकुंड ते अहिल्याबाई होळकर पूल आणि परिसरातील कामे पूर्ण करण्यावर भर.

  • रामकुंड परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर आव्हान.

  • रामकुंड परिसर सुशोभिकरन कामांवर दिला जातोय भर; स्वच्छता ठेवण्यावर विशेष भर.

एकीकडे स्वच्छता, दुसरीकडे दुर्गंधी

रामकुंड अणि गांधी तलाव चकाचक करण्यात आले असले तरी, दुतोंड्या मारुतीलगत असलेल्या पुलापासून खालच्या भागातील गोदापात्रात मात्र प्रचंड अस्वच्छतेमुळे दुर्गंधी येत असल्याचे समोर येत आहे. सध्या नदीपात्रात पाणी नसल्यामुळे पात्रातील राडारोडा उघडा पडला आहे. पात्रात असलेल्या चिखलात कपडे, निर्माल्य, मूर्ती अशा अनेक बाबी असल्याने त्यांची दुर्गंधी येत आहे.

ध्वजारोहणापूर्वी या पात्राची स्वच्छता करणे जवळीलपास अशक्य असल्यामुळे प्रशासनाकडून केवळ या भागातील घाट सुशोभीकरणावरच भर दिला जात आहे. ध्वजारोहणाला गंगापूर धरणातून आवर्तन सोडले जाणार असल्यामुळे पात्रातील हा राडारोडा झोकला जाण्याच्या अपेक्षेने प्रशासन निश्चित आहे. मात्र, या पात्रांचीदेखील तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी भाविकांंकडून केली जात आहे.

ध्वजस्तंभ झाकले

रामकुंडावर दोन्ही ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत. ध्वजस्तंभावरील प्रतीके लाल कपड्याने झाकून ठेवण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर पूर्वीचा संघाचा लोगो लावल्यामुळे वाद उपफ्लाून आला होता. या ठिकाणीदेखील तसा प्रकार घडू नये म्हणूनच अगोदरच सर्व प्रतीके लाल कपड्यांनी झाकली आहेत.

अतिक्रमे हटविली, आव्हान कायम; काही हातगाड्यांची अतिक्रमणे कायम

ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर रामकुंड अणि घाट परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. मात्र, अशाही काही विक्रेते सायंकाळच्या सुमारात परिसरात हातगाडीवर दुकाने दारात असल्यामुळे अतिक्रमणांचे आव्हान कायम आहे. रामकुंड परिसरात दोन संत्र्यामध्ये व महिला सुरक्षाकर्तक नेमले आहेत. हा परिसर ३१ ऑक्टोबरपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, अशाही काही भाविक परिसरात येत असल्याने विक्रेते सायंकाळच्या सुमारास परिसरात हातगाड्या लावत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT