नाशिकरोड : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बडनेरा - नाशिकरोड अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
बडनेरा - नाशिकरोड अनारक्षित दैनिक विशेष गाडी ३१ डिसेंबरपर्यंत चालवली जाणार होती. परंतु तिचा कालावधी आता १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या गाडीच्या ५९ फेऱ्या होतील. तसेच नाशिकरोड - बडनेरा फेरीसुद्धा आता २८ फेब्रुवारी २६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. वरील दोन्ही गाड्यांच्या वेळापत्रकात, संरचनेत व थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.