Death Pudhari
नाशिक

Goa Suicide Case | पुणे येथील तरुणाची बेतीत गळफास घेऊन आत्महत्या

Akshay Kadam Suicide Case | आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा

बेती येथील गुरुद्वारा मंदिराजवळील भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. दरम्यान, तोर्डा खाडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पर्वरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२) दुपारी सुमारे अडीच वाजनाच्या सुमारास बेती येथील गुरुद्वारा मंदिराजवळील एका भाड्याच्या खोलीत एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपनिरीक्षक विघ्नेश नाईक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

तिथे एका तरुणाचा मृतदेह घराच्या लाकडी वाश्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवण्यात आला. मृताची ओळख अक्षय प्रमोद कदम (वय ३०, मूळ रा. येरवडा, पुणे) अशी पटली असून तो बेती येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठवला असून तो सध्या बांबोळी येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आर्थिक अडचणींमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पुढील तपास निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तोर्डा खाडीत अज्ञाताचा मृतदेह

दरम्यान, तोर्डा खाडीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहितीही पर्वरी पोलिसांना मिळाली. संबंधित व्यक्तीचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षे असून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT