Sahebrao Datir attacked  
नाशिक

Sahebrao Datir attacked - प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर यांच्यावर हल्ला

प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे साहेबराव दातीर यांच्यावर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

सिडको : प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर यांच्यावर शनिवारी (दि. १५) रात्री ११.३० च्या सुमारास महामार्गावर विल्होळीजवळ दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव दातीर हे शनिवारी विल्होळी येथून रात्री ११.३० च्या सुमारास नाशिकच्या दिशेने जीपमधून चालले होते. त्यावेळी दोन ते तीन अज्ञात संशयितांनी रस्त्यात त्यांचे वाहन अडविले. वाहनाच्या काचा फोडून दातीर यांना बाहेर काढत दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी या प्रकाराची आपल्या बंधूंना मोबाइलवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांचे बंधू व अंबड ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

प्रकल्पग्रस्त साहेबराव दातीर हे गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि अन्यायाविरोधात सातत्याने लढा देत आहेत. तसेच एमआयडीसी परिसरातील अतिक्रमण, रस्त्यांवरील खड्डे व प्रशासनाच्या कारभाराविरोधातही त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच हल्लेखोर कोण आहेत, याचा तपास वाडीव-हे पोलिस करीत आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवून याप्रकरणी वाडीव-हे पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी अंबड ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT