PM Narendra Modi  
नाशिक

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्व दिल्लीत पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले रावणदहन

PM Narendra Modi | प्रभू श्रीरामांच्या आदर्शवर चालण्याचे देशवासीयांना आवाहन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आव्हाने कितीही कठीण असले, तरी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या संकल्प्याचे रूपांतर शक्तीत करून परिश्रमाच्या जोरावरच आव्हानांवर मात करता येते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

विजयादशमीच्या पावन पर्ओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पूर्व दिल्लीतील आय. पी. एक्सटेंशन येथील 'उत्सव मैदाना'वर आयोजित दसरा महोत्सवात भाग घेत पारंपरिक पद्धतीने रावणदहन केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते द्वारका येथे रावणदहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही दिल्लीतील द्वारका सेक्टर १० येथील श्री रामलीला कमिटीच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन रावणदहन केले. याप्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा देताना राष्ट्रपती म्हणाल्या, दसरा हा सण अधर्मार्चा धर्मीचा आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतीक आहे.

प्रभू श्रीराम हे नीतिमता आणि नैतिक आचरणारे मूम्रिमंत रूप आहेत. देश-विदेशात सादर होणाऱ्या रामलीलेच्या माध्यमातून भावी पिढीला रामायणातील उदात्त मूल्यांची आणि आदर्शांची शिकवण मिळते. रावणदहनापूर्वी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले की, आज देशातील प्रत्येक गावात आणि शहरात प्रभू श्रीरामांचे आदर्श आणि चैतन्य अनुभवायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात सादर होणारी रामलीला केवळ एक परंपरा नसून प्रभू श्रीरामांची शिकवण जिवंत ठेवण्याचे माध्यम आहेत. रामलीलेची परंपरा आपल्याला अधर्मार्चा, दहशतीवर शांततेचा आणि असत्यावर शाश्वत सत्याचा विजय कसा होतो, याची सातत्याने आठवण करून देते.

मोदी म्हणाले, समाजातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांची सेवा करणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. प्रभू श्रीरामांचे संपूर्ण जीवन आपल्याला स्वावलंबनाची शिकवण देते. संकट कितीही मोठे असले किंवा आव्हान कितीही कठीण असले, तरी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या संकल्प्याचे रूपांतर शक्तीत करून परिश्रमाच्या जोरावरच आव्हानांवर मात करता येते. 'विकसित भारत' आणि 'आत्मनिर्भर भारत' घडवण्यासाठी हाच मंत्र अंगीकारून आपल्याला पुढेायचे आहे.

रामराज्य म्हणजे भेदभावमुक्त समाज

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी 'रामराज्य' या संकल्पनेचा अर्थ विशद केला. ते म्हणाले, रामराज्य म्हणजे असा समाज जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसेल, प्रत्येकाला न्याय मिळेल आणि सर्वांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध असतील. सत्तेचा उद्देश केवळ राज्य करणे हा नसून जनतेचे कल्याण साधणे हा असायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT