Nashik Municipal Corporation 
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक मनपात प्रशासकीय फेरबदल! प्रदीप चौधरींना मुदतवाढ, तर नीलेश भदाणेंची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

Nashik Municipal Corporation | अतिरिक्त आयुक्त झगडे मनपातून तडकाफडकी कार्यमुक्त

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदावरून गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळ अखेर संपला आहे. प्रदीप चौधरी यांची मुदत संपल्याने त्यांच्या जागी नीलेश भदाणे यांच्या नियुक्तीच्या शासन निर्णयात फेरबदल केला असून, चौधरी यांना एक वर्षासाठी मुदतवाढ देताना नीलेश भदाणे यांनाही अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती दिली आहे.

विशेष म्हणजे भदाणे यांच्यासाठी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांची शासन प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली होती. चौधरी यांची ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी होती.

महापालिकेतील सेवेत चौधरी यांना चार वर्षे झाल्यामुळे त्यांच्या जागी शासनाच्या नगरविकास विभागाने २१ एप्रिल २०२६ रोजी आदेश जारी करत जिल्हा नियोजन अधिकारी गट अ यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली होती.

भदाणे हे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी दाखलही झाले होते. मात्र, त्यांना रुजू करून घेतले नव्हते. भदाणे हे बराच काळ नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना रुजू करून घेतले जात नसल्यामुळे त्यांनी 'मॅट'कडे अपील केल्याचीही चर्चा होती. अखेर प्रशासकीय पातळीवर चौधरी आणि भदाणे यांच्यात समेट घडला असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर चौधरी यांना नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर आदेशाच्या दिनांकापासून आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

तर २१ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशात फेरबदल करत भदाणे यांनाही महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर सामावून घेतले आहे. भदाणे यांच्यासाठी स्मिता झगडे यांची खुर्ची रिकामी केली आहे. झगडे यांना नाशिक महापालिकेतून कार्यमुक्त केले आहे. त्यांना मात्र अद्याप पदस्थापना मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT