नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासनाच्या विविध पेन्शन योजनांतील लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वृद्ध, दिव्यांग, विधवा तसेच निराधार नागरिकांना तहसील कार्यालय, बैंक किंवा पोस्ट कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
शासनाने हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने बेनेफिशियरी सत्यपाल अॅप ही ऑनलाइन प्रणाली विकसित केली असून मोबाइलद्वारेच हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
त्यामुळे वेळ, पैसा आणि कार्यालयीन हेलपाटे वाचणार आहेत. राज्य विचार करीत आहे. पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनाही ही ऑनलाइन सुविधा लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे.
असे करा हयातीचा दाखला
ऑनलाइन मोबाइलमध्ये बेनिफिशियरी सत्यपाल अॅप आणि आधार फेस आयडी अॅप डाउनलोड करावे, भाषा निवडून आधार क्रमांक नोंदवावा. आधार क्रमांक व मोबाइल नंबरद्वारे नोंदणी करावी. संबंधित योजना निवडून व्हेरिफिकेशन पर्यायावर क्लिक करावे. ओटीपी टाकून चेहरा ओळख किंवा बोटांच्या ठशाद्वारे पडताळणी करावी. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हयात प्रमाणपत्र तयार होते. प्रमाणपत्र लगेच डाउनलोड करता येते.
दिव्यांग बांधवांना हयातीच्या दाखल्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात हेलपाटे मारावे लागत होते. शासनाच्या या निर्णयामुळे दिव्यांगांसह सर्व लाभाथ्यर्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.- दीपक शेवाळे, दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्था
सर्व योजनेच्या लाभाथ्यर्थ्यांनी 66 लवकरात लवकर आपले ऑनलाइन हायातीचे दाखले स्वतःच्या मोबाइलवरून भरून घ्यावे. जमत नसेल, तर नजीकच्या सेतू केंद्रामधून भरून घ्यावे. त्याची फक्त ५० रुपये फी द्यावी.-माधुरी आंधळे, तहसीलदार, नाशिक