Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बैलजोडी ठार File Photo
नाशिक

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बैलजोडी ठार

वनविभागाने पिंजरा बसवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pair of bulls killed in leopard attack

देवळा : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील महाल पाटणे येथे शनिवारी (दि. १५) पहाटे ६ च्या सुमारास दोन बिबट्यांनी शेतकरी सुभाष भारती यांच्या मालकीच्या बैलांवर हल्ला करत ठार केल्याची घटना घडली. या ठिकाणी गेल्या १५ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. वनविभागाने पिंजरा बसवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात महाल पाटणे येथील ग्रामस्थांनी शनिवारी देवळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच ठार झालेल्या बैलाचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी केली. दरम्यान, तालुक्यात बहुतांश गावांमध्ये बिबट्यांची दहशत वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.

शेतकऱ्यांनी आपली व जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले असून, शेतात व वस्ती करून राहणारे शेतकरी बिबट्याच्या भीतीपोटी पिकांना पाणी देण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याचे बोलले जात आहे. याची दखल वनविभागाने घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरा लावून गावून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT