नाशिक : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये गेले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील ६१ पर्यटकांचा समावेश आहेत. त्यापैकी ५० जण टॅव्हल्ससोबत, तर ११ जण स्वतंत्ररित्या गेले आहेत. सर्व पर्यटक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
दरम्यान, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हेल्पलाईन नंबर प्रसिध्द केला असून, पर्यटकांना तसेच नातेवाईकांनी या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भ्याड हल्लानंतर काश्मिरमध्ये पर्यटक अडकल्याची भिती व्यक्त केली जात होती. त्यावर, जिल्हा नियंत्रण कक्षाने बुधवारी (दि. २३) विविध ८० ट्रॅव्हल एजन्सीशी संपर्क साधत चर्चा केली. यात 50 पर्यटक टॅव्हल्स कंपन्यांसोबत गेल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. तर 11 पर्यटक स्वतंत्ररित्या पर्यटनासाठी गेले असून त्यांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधला आहे. असे एकूण जिल्ह्यातील एकूण 61 पर्यटक सध्या जम्मू काश्मिर येथे असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.
यातील पर्यटक लहाने यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत त्यांची मुलगी व इतर आठ व्यक्ती श्रीनगर येथे असल्याची माहिती दिली. श्रीनगर येथे एकूण तीन कुटुंब गेली आहेत. यात एकूण आठ व्यक्ती, तीन महिला, तीन पुरुष, दोन लहान मुले असल्याची माहिती आहे. सर्वजण श्रीनगर येथे असून त्यांचे विमानाचे तिकिट शनिवारचे (दि. 26) आहे. परंतु, त्यांनी तत्पूर्वीच परतीचे तिकिट मिळावे, अशी त्यांनी विनंती केली आहे. तसेच कु. सिध्दी मुसळे यांनी संपर्क साधत दोघे भाऊ, बहिण श्रीनगर येथे सुरक्षित ठिकाणी असल्याचे कळवत परतण्यासाठी लवकर तिकिट मिळावे, अशी त्यांनी विनंती केली. तर अजून एक पर्यटक पहलगम येथील हॉटेल्समध्ये सुरक्षित आहेत.