नाशिकरोड : आयुक्त प्रवीण गेडाम यांना अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी. 
नाशिक

Scheduled Castes Sub Classification Opposition|अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावित प्रक्रियेला विरोध दर्शवत पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे मंगळवारी महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम निवेदन देण्यात आले. यामुळे समाजात भेदभाव आणि सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणत्याही जातीचे स्वतंत्र उपवर्गीकरण न करता संपूर्ण प्रवर्ग एकसंध ठेवावा.

संविधानाने दिलेल्या समानता, सामाजिक न्याय आणि बंधूता या मूल्यांच्या रक्षणासाठी उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ स्थगित अथवा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे राज्यभर निदर्शने व आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले जात आहे.

शासनाने मागणीची दखल न घेतल्यास भविष्यात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल आयुक्त गेडाम यांना हे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. शशिकांत उन्हवणे, अनिल गांगुर्डे, मुरली घोरपडे, देवीदास डोखे, नितीन पगारे, रवि खरात, इम्रान शेख, सिद्धार्थ भालेराव, शकील शेख, जावेद शेख, पप्पू जाधव, भारत विणकर, आप्पा पगारे, प्रदीप वीर, प्रवीण पगारे, प्रवीण जाधव, मीना पगारे, मुक्ता खर्जुल, पंचफुला गायकवाड, अलका निकम उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT