nida khan Pudhari
नाशिक

Nida Khan | 'टीसीएस' प्रकरणाची झळ संसारालाही, निदा खानच्या पतीचा घटस्फोटावर निर्णय ठाम

Nida Khan husband firm on divorce amid TCS controversy | 'टीसीएस' प्रकरणाची झळ संसारालाही, निदा खानच्या पतीचा घटस्फोटावर निर्णय ठाम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : 'टीसीएस' प्रकरणामुळे निर्माण झालेला मानसिक ताण, कुटुंबाला सहन करावा लागलेला त्रास आणि समाजात वावरताना येणाऱ्या अडचणींचा दाखला देत निदा एजाज खान हिचा पती मोईन नाविद खान याने घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम भूमिका घेतली आहे. या घटस्फोट अर्जावर शुक्रवारी (दि. १६) नाशिकरोड येथील कौटुंबिक न्यायालयात पहिल्या समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली. मात्र, समुपदेशनानंतरही मोईनने आपला निर्णय बदललेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

'टीसीएस' कंपनीतील तरुण-तरुणींचे कथित धर्मांतर, अत्याचार आणि फसवणुकीच्या प्रकरणात संशयित म्हणून निदा खानचे नाव समोर आले होते. यामुळे वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. निदाचा पती मोईन खान याने वैवाहिक नाते संपुष्टात आणण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

समुपदेशनादरम्यान दोघेही न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार मध्यस्थी केंद्रात त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी मोईनने 'टीसीएस' प्रकरण समोर येण्यापूर्वीपासूनच निदाचे घरातील वर्तन योग्य नसल्याचे सांगितले.

यामुळे कुटुंबाला वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले आहे. मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. समाजातील लोकांत वावरतानाही अडचणी येत असल्याचे त्याने नमूद केले. पहिल्या समुपदेशनानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंना विचार करण्यासाठी वेळ दिला. मात्र, मोईन घटस्फोटाच्या मागणीवर ठाम असल्याचे समोर आले. दुसरीकडे, निदा खान संसार टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दोन गुन्ह्यांत नाव

निदा खान हिचे नाव देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांत संशयित म्हणून समोर आले आहे. या प्रकरणात तिला न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे. दरम्यान, घटस्फोट अर्जावर येत्या २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मोईनतर्फे अॅड. नितीन पंडित, तर निदातर्फे अॅड. शोभा ताजनपुरे बाजू मांडत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT