NEET Paper Leak Nashik pudhari
नाशिक

NEET Paper Leak Nashik: नीट पेपर फुटीचे नाशिक कनेक्शन; एकाला अटक, १० लाखात प्रश्नपत्रिका मिळवली १५ लाखात विकली

Anirudha Sankpal

NEET Paper Leak Nashik : नीट पेपर फुटीनंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत NEET Exam 2026 पुढे ढकलली आहे. पेपर फुटीच्या आरोपानंतर ३ मे रोजी होणारी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, प्राथमिक तपासात या पेपर फुटीचे मोठे रॅकेट असल्याच समोर येत आहे. नीट पेपर फुटेची नाशिक कनेक्शन देखील समोर आले असून नाशिकमधून एकाला या प्रकरणी अटक देखील झाली आहे. नाशिकच्याच प्रिंटिंग प्रेसमध्ये या पेपर फुटीची छपाई झाली असल्याचा आरोप झाला आहे. आता या प्रकरणाचा तसाप हा सीबीआय कडे देण्यात आला आहे.

नाशिकमध्येच फुटीची सुरूवात

फुटलेल्या नीट परीक्षेच्या पेपरची पहिली कॉपी ही नाशिकमधील असल्याचं उघड झालं आहे. नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसमध्ये याची छपाई झाली अन् त्याचे १० सेट्स हे हरियाणात गेले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा आरोप झाल्यामुळं सीबीआयची तपास पथके महाराष्ट्रासह उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये आता चौकशी करणार आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळं देशभरातील जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांना याचा मनःस्ताप सहन करावा लागणार आहे.

१० लाख मिळवली प्रश्नपत्रिका

नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी आर्थिक देवाण घेवाण देखील झाल्याची सूत्रांची माहिती आहे. हा पेपर १० लाख रुपयात मिळवण्यात आला पुढे तो १५ लाख रुपयात विकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या संशयित आरोपीने १० लाख रूपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती पुढे १५ लाखात विकल्याची माहिती मिळत आहे. यानंतर प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रम आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली.

असा पसरला देशभरात फुटलेला पेपर...

  • नाशिकच्या एका झेरॉक्स सेंटरमध्ये पेपरची झेरॉक्स काढण्यात आली.

  • नाशिकमधून हा पेपर हरियाणामध्ये नेण्यात आला.

  • हरियाणामधील गुरूग्राममध्ये एका डॉक्टरपर्यंत पोहचला.

  • हरियाणातून हा पेपर राजस्थानमधील जयपूरमध्ये तेथून जमवा रामगड इथं गेला.

  • तेथुन हा फुटलेला पेपर सिकर शहरात पोहचला. इथूनच देशभरातील अनेक शहरात याच्या कॉपी पोहचल्या.

संशयित BAMS शिक्षण घेतलेला...

नाशिकमधून अटक झालेला हा युवक ३० वर्षीय संशयित आरोपी BAMS शिक्षण घेतलेला असल्याची माहिती मिळाली आहे. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे.

राजस्थान CBI कडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेची कारवाई करण्यात आली.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने केस कापले असल्याने ओळखू आला नाही. मात्र क्राईम ब्रांच टीमने आरोपीला ओळखले आणि तत्काळ ताब्यात घेतले.

नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे पोलिसांनी शोध घेत अटक केली. संबंधित युवकाची मेडिकल काऊन्सेलिंग एजन्सी असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित आरोपीने पेपर इकडून तिकडे देण्यासाठी फक्त मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. त्याने 10 लाखांचा पेपर 15 लाखांना विकण्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

कोणी आहे मास्टर माईंड?

जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हा या संपूर्ण प्रकरणाचा कथित सूत्रधार किंवा मास्टरमाइंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास अजून सुरू असून अजून काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

परीक्षा प्रश्नपत्रिका अधिकृतपणे छापण्यापूर्वीच मनीषच्या हाती संभाव्य प्रश्न लागले होते. हे प्रश्न नंतर विविध माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचवण्यात आले असा संशय आहे, आता तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

NTA च्या शिफारशीनंतर CBI आता या प्रकरणात अधिकृतपणे तपास सुरू करणार असून, मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT