NEET Exam  File Photo
नाशिक

NEET paper case - मुलीसाठी 5 लाखांना खरेदी केला 'नीट'चा पेपर

लातूरनंतर सीबीआयची नांदेडमध्ये कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नांदेड : देशभरात खळबळ माजवलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत शनिवारी पोहोचले असून, सीबीआयच्या पथकाने नांदेडातील विद्युतनगर भागातील रहिवासी कदम यांच्या फ्लॅटवर पथकाने छापा टाकत तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी केली. आपल्या मुलीसाठी तब्बल ५ लाख रुपयांत 'नीट' चा पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप या कुटुंबावर आहे.

लातूर येथील एका नामांकित कोचिंग क्लासचालकाची शुक्रवारी कसून चौकशी केल्यानंतर सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले. या कारवाईमुळे नांदेडमधील काही खासगी कोचिंग क्लासेस चालक आणि संशयास्पद असल्याची माहिती विद्यार्थी आता सीबीआयच्या रडारवर सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

नांदेडमध्ये सीबीआय पथकाने घराचे दरवाजे बंद करून झाडाझडती सुरू केली. या कारवाईदरम्यान सीबीआयचे पथक प्रामुख्याने अनुत्तरित प्रश्नांचा माग काढत असून, त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT