Ashok Kharat case | अशोक खरातच्या जमिनींना कोट्यवधींचा भाव

तीन कोटींच्या सरकारी मोबदल्याची शक्यता
Ashok Kharat case
Ashok Kharat case
Published on
Updated on

नाशिक : अनेक महिलांना दैवी शक्तीच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या अशोक खरातच्या जमिनींना आता सोन्याहून अधिक भाव मिळत असल्याची चर्चा शहरात रंगली असून, जेलमध्ये असला, तरी खरातचा पैशांचा प्रवाह थांबलेला नाही. खरातच्या कुटुंबाच्या नावे असलेल्या जमिनींमधून कोट्यवधीचा मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

एकीकडे पोलिस तपास, न्यायालयीन प्रक्रिया, अंमलबजावणी संचालनालय आणि विविध आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये महत्त्वाकांक्षी कुंभमेळा रिंग रोड प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रकल्पासाठी शहर परिसरातील जमिनी भूसंपादन प्रक्रियेत घेतल्या जात आहेत. त्यात खरात आणि कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीही संपादित होणार आहेत. गौळानेतील जमिनीच्या मोबदल्यात खरात आणि त्याची पत्नी कल्पना यांना ८२ लाख ८३ हजार रुपये मिळणार आहेत.

Ashok Kharat case
Shirdi Fraud Case | नाशिकच्या भोंदूबाबाचे 'ईडी' कनेक्शन! प्रतिभा चाकणकरांची चौकशी; 2 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा पेच

पाथर्डी शिवारातील जमीन संपादित होत असल्याने खरातच्या दोन्ही मुली तृप्तबाला खरात आणि सृष्टी खरात यांच्या नावे सुमारे १ कोटी ८२ लाख रुपयांचा मोबदला मंजूर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरात सध्या गंभीर गुन्ह्यांत अटकेत असून, ७ महिलांचे शोषण, फसवणूक, मालमत्ता व्यवहार, बोगस आर्थिक उलाढाली आणि कथित बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी विविध यंत्रणांकडून तपास सुरू आहे. खरात कारागृहात असल्याने भूसंपादन प्रक्रियेला तो उपस्थित राहू शकणार नसल्याची शक्यता आहे. खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्याच्या मुली तृप्तबाला आणि सृष्टी खरात शासकीय कार्यालयात हजेरी लावू शकतात, अशी माहिती आहे. आगामी काळात या व्यवहारांवर तपास यंत्रणांचे लक्ष राहणार का, ईडी किंवा इतर चौकशी यंत्रणा या आर्थिक लाभावर काही निर्बंध आणतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashok Kharat case
Anjali Damania Statement| अंजली दमानियांचा राजकीय स्फोट! अशोक खरात प्रकरणाशी संबंधित बड्या नेत्यांची नावे जाहीर

भांडे यांच्या पत्नीचेही नाव

भोंदू अशोक खरातशी कनेक्शनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आणि सध्या निलंबित असलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे - पाटील यांच्या पत्नीचे नावही संबंधित जमीन व्यवहारांशी जोडले जात असल्याची चर्चा आहे. या भूसंपादन प्रक्रियेत त्यांनाही लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news