नाशिक

National Handloom Day | राष्ट्रीय हातमाग दिन | यंत्रांच्या युगात हस्तकलेचा वारसा आणि विणकरांची अप्रतिम कलाकुसर

National Handloom Day | 170 वर्षांची परंपरा असणारी सोनी पैठणी; भारतीय विणकाम संस्कृतीचे जतन करणारा वारसा

पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस १९०५ मध्ये झालेल्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यावेळी भारतीयांनी परदेशी कापडाविरुद्ध शांततेच्या मार्गाने आणि ठामपणे विरोध करत, घरगुती हातमागावर विणलेल्या कापडाचा स्वीकार केला होता. शंभरहून अधिक वर्षांनंतरही, हा दिवस आजही तोच प्रश्न, थोड्या सौम्य स्वरूपात विचारतो, वेगवान फॅशन आणि त्याहूनही वेगवान यंत्रांच्या युगात, हाताने विणलेल्या धाग्याला अजूनही महत्त्व का आहे?

हातमाग म्हणजे नेमके काय आहे? हातमाग एक यंत्र नसून, माणसाचाच विस्तार आहे. प्रत्येक हातमागावर विणलेली साडी ती विणणाऱ्या व्यक्तीची खास लय अंगावर बाळगते. धाग्याच्या ताणातील सूक्ष्म फरक, रंगांची वैयक्तिक निवड, अनेक वर्षे बहुधा आई-वडिलांकडून किंवा आजी-आजोबांकडून शिकलेल्या तंत्राची रुजलेली स्मृती.

हातमागावरील कोणत्याही दोन वस्तू खऱ्या अर्थाने एकसारख्या कधीच नसतात, कारण कोणत्या ही दोन हातांची लय एकसारखी नसते. यंत्रमाग कितीही प्रगत झाला, तरी नेमके हेच तो कधीही पुन्हा निर्माण करू शकत नाही.

बंगालच्या जामदानी विणकरांचे उदाहरण घ्या, जे कोणत्याही यांत्रिक साधनाच्या मदतीशिवाय, प्रत्येक धागा हाताने उचलून कापडावर पाण्याच्या खुणेसारखे तरंगणारे नक्षीकाम तयार करतात किंवा ओडिशा आणि तेलंगणाच्या

इकत विणकरांचे उदाहरण घ्या, जे धागा मागावर चढविण्याआधीच प्रत्येक धागा रंगवितात आणि विणकाम सुरू झाल्यावरच नक्षी उलगडावी यासाठी प्रत्येक रंग नेमका कुठे पडेल याची विलक्षण अचूक गणना करतात. यासाठी एक ओल विणण्याआधीच महिनोनमहिने नियोजन करावे लागते.

महाराष्ट्रात पैठणीच्या रूपाने ही परंपरा आजही सुरू आहे. गोदावरीच्या काठावरील प्राचीन पैठण गावात जन्मलेली, जिथे विणकर रंगीत रेशीम आणि जरीचा धागा हाताने गुंफून टेपेस्ट्री विणकाम या तंत्राने, एका वेळी एक विणधागा जोडत मोर आणि कमळाची नक्षी घडवितात कधीकधी एकच पदर पूर्ण करायला आठवडे लागतात. नाशिकमध्ये सोनी-पैठणीसह अनेक पैठणी विक्रेत्यांकडून विणकाम केले जाते.

विणकाम केवळ तंत्र नाही, तर वारशाने चालत आलेली ज्ञानपरंपरा आहे. भारताचे हातमाग क्षेत्र आजही देशातील ग्रामीण रोजगाराच्या सर्वात मोठ्या स्रोतांपैकी एक आहे, जिथे लाखो विणकर त्यातलीन अनेक स्त्रिया - पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या घरगुती मागांवर काम करतात.

म्हणूनच राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व केवळ भावनिकतेपुरते मर्यादित नाही. प्रत्येक हातमाग खरेदी ही, खऱ्या अर्थाने, एखादे कौशल्य यंत्राने बदलले जाण्याऐवजी माणसाच्या हातातच जिवंत ठेवण्यासाठी दिलेला कौल असतो.

सोनी पैठणी, पैठणी विणकाम परंपरेत मूळ रुजलेली १७० वर्षे जुनी संस्था, अशाच एका पालनकर्त्याचे उदाहरण आहे. त्यामुळेच हातमाग दिन हा आपली परंपरा पुढे चालवण्यासाठी आणि यंत्रापेक्षा हाताला महत्त्व देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
— संजय सोनी, संचालक, सोनी पैठणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT