Zilla Parishad Nashik / जिल्हा परिषद नाशिक Pudhari News Network
नाशिक

Nashik Zilla Parishad Sports | मैदानात रंगली प्रशासकीय 'रस्सीखेच'! जिल्हाधिकारी आणि आमदारांनी लावला जोर, पण बी़डीओच पडले भारी

Nashik Zilla Parishad Sports | जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत भारतीय प्रशासक सेवेतील अधिकारी (आयएएस) विरोधात गटविकास अधिकारी, विभागप्रमुख यांच्या झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत गटविकास अधिकारी भारी पडले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत भारतीय प्रशासक सेवेतील अधिकारी (आयएएस) विरोधात गटविकास अधिकारी, विभागप्रमुख यांच्या झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत गटविकास अधिकारी भारी पडले आहेत.

तर, क्रिकेट सामन्यातही मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संघाला कळवण तालुका संघाने पराभूत केले. तीन दिवसीय या स्पर्धेचा सोमवारी (दि. २) समारोप होत आहे. पोलिस परेड मैदानावर जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारीवर्गाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरू आहेत.

आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ झाला. दरवर्षी विभागप्रमुख व गटविकास अधिकारी यांच्यात रस्सीखेच सामना हा खेळला जातो.

प्रत्येक वर्षी या सामन्यात गटविकास अधिकारी जिंकतात. यंदाच्या वर्षी मात्र प्रथमच विभागप्रमुख यांनी हा सामना जिंकला. समूहात विभागप्रमुखांच्या आमदार पवार, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१) व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, धावणे आदी स्पर्धा पार पडल्या.

रवींद्र विद्यालयाच्या मैदानावर मुख्यालय विरुद्ध कळवण तालुका संघात क्रिकेट सामना झाला. यात मुख्यालय संघाचा पराभव झाला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यात कर्मचाऱ्यांनी कला सादर केल्या. विविध स्पर्धेतील अंतिम सामने हे सोमवारी (दि.२) होणार असून, त्यानंतर स्पर्धांचा समारोप होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT