नाशिक: आरोग्य विभागात टेबलावरील फायलींच्या गाठोड्याबाबत विचारणा करताना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार. 
नाशिक

Nashik Zilla Parishad CEO visited|'टेबलावर हे कसले गाठोडे ?'

जि. प.चे सीईओ ओमकार पवार यांच्याकडून विभागांना भेटी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गुरुवारी (दि.१९) मुख्यालयात भेटी देत असताना आरोग्य विभागात टेबलावर गाठोडे दिसले. त्यावर पवार यांनी कर्मचाऱ्यांना हे कसले गाठोडे येथे काय करतेय, अशी विचारणा केली. यानंतर गाठोड्यातील फाइल तत्काळ कपाटात हलवण्याचे निर्देश त्यांनी दिले. कृषी, पशुसंवर्धन, समग्र शिक्षा विभागाबाहेर पाट्या नसल्याचेही आढळले.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनुसार कार्यालयीन स्वच्छता, ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीची सुनिश्चितता करण्यासाठी पवार यांनी सर्व विभागांना भेट देत स्वच्छता आणि प्रशासकीय कामकाजासाठी राबवण्यात येणाऱ्या ई-ऑफिस प्रणालीच्या वापराची पाहणी केली. यात पवार यांनी विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला. कार्यालयातील स्वच्छता, अभिलेखांची मांडणी, कामकाजातील शिस्त, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. ई-ऑफिस प्रणालीच्या वापराची खातरजमा करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी त्यांनी काही कर्मचाऱ्यांच्या संगणकावर स्वतः लॉग-इन करत ई-ऑफिस प्रणालीचा वापर केला जात आहे का, याची माहिती घेतली. डिजिटल प्रणालीचा वापर दैनंदिन कामकाजात कायम करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे उपस्थित होते.

सोनाली भार्गवे यांना शाबासकी

ओमकार पवार हे विभागात प्रत्यक्ष जात ई-ऑफिस प्रणाली वापराबाबत बघत होते. यात कृषी विभागातील सहायक प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे यांनी १०० टक्के ई-ऑफिस प्रणालीचा वापर केल्याचे तसेच एकही पेंडिंग नसल्याचे दिसून आले. त्यावर पवार यांनी भार्गवे यांना शाबासकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT