नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पीडितांना सक्षम व संवेदनशील मदत मिळण्यासाठी सहायक व्यक्तींनी आपली भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्देशांनुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने सहायक व्यक्तींचे विभागस्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
याचे उद्घाटन पगारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले, बालहक्क आयोगाचे सदस्य संजय सेंगर, सायली पालखेडकर, बाल कल्याण समिती अध्यक्ष मिलिंद बाबर, सदस्य अॅड, पल्लवी घुले, पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे, डॉ. हेमंत घंघाळे, समुपदेशक पारीख हे उपस्थित होते.
सचिव भोसले यांनी अशा प्रशिक्षणांमुळे सहायक व्यक्तींचे कार्य अधिक प्रभावी होते, असे सांगितले. पीडित व्यक्तींना साहाय्य करताना आवश्यक कायदेशीर बाबींबाबत अॅड. सेंगर तसेच समुपदेशक श्रीमती पारीख यांनी मार्गदर्शन केले. तज्ज्ञांनी प्रशिक्षणार्थीना भारतीय नागरी सुरक्षा संहिता,
पोक्सो कायदा, त्यातील नियम, प्रथम माहिती अहवाल, वैद्यकीय तपासणी तसेच समुपदेशन अशा विषयांवर माहिती दिली. मार्गदर्शक तत्त्वांनुसार सहायक व्यक्तींची भूमिका स्पष्ट करण्यात आली. विभागातील अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार व जळगाव येथील अधिकारी, समुपदेशक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते. निवेदिता झेंडे यांनी सूत्रसंचालन