नाशिक : शहर व परिसरातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये जानेवारी 2024 ते मे 2025 या 17 महिन्यांच्या कालावधीत एकूण 1,937 विवाहांची नोंदणी झाली आहे. त्यात स्पेशल मॅरेज 1 हजार 242, तर विवाहोत्तर नोंदणी 695 अशा एकूण 1 हजार 937 विवाहांची नोंदणी झाल्याची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाने दिली आहे.
भारतीय कायद्यानुसार विवाह नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. त्यामुळे विवाह होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर नोंदणी करणे आवश्यक आहे. विवाह नोंदणीमुळे शासकीय योजनांतील लाभ, विशेषतः महिलांसाठी असलेल्या योजना, वारसा हक्क, ओळखपत्र व पासपोर्ट प्रक्रियेसाठी विवाह नोंदणी आवश्यक असल्यामुळे नागरिक नोंदणीस पुढाकार घेत आहेत. ऑनलाइन नोंदणी प्रणाली, या संकेतस्थळावरून घरबसल्या अर्ज करता येतो त्यामुळे विवाहनोंदणी प्रक्रियेत सुलभता आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व अटींबाबत माहिती देण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिर घेतले जाते.
वधू- वराचे आधारकार्ड, पॅनकार्ड, निवासाचा पुरावा
दोन साक्षीदारांचे ओळखपत्र. विवाहाचा फोटो, निमंत्रण पत्रिका
विवाह झाल्याची खात्री देणारा करारनामा.
शुल्क व वेळ
विवाह नोंदणीसाठी शासकीय शुल्क रुपये 150 ते 200 दरम्यान आहे.
अर्ज केल्यानंतर 3 ते 7 दिवसांत विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते.
तत्काळ प्रमाणपत्र हवे असल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाते.