Water Supply Pudhari
नाशिक

Nashik Water Supply : पाणी जपून वापरा! नाशिकमध्ये उद्या 'या' प्रभागांमध्ये पाणी नाही

महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीतर्फे विविध भागांत दुरुस्ती कामे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडतर्फे शनिवारी (दि. २०) शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे तसेच जलकुंभांवर फ्लो मीटर बसविण्यासह पाणीपुरवठाविषयक दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी (दि. २१) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग आणि स्मार्ट सिटी कंपनीतर्फे शनिवारी जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीसह, पाणी गळती, जलकुंभावर फ्लो मीटर बसविण्याची कामे शनिवारी हाती घेतली जाणार आहेत. त्याबरोबरच शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरणवाहिन्या तसेच उपवितरणवाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉल्व्हची दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे आदी देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक महापालिका क्षेत्रात संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. रविवार (दि. २१) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

या प्रभागांमध्ये होणार कामे

प्रभाग क्र. १५ मधील द्वारका व गोडेबाबा जलकुंभ भरणारी ५०० मी.मी. व्यासाचे गुरुत्ववाहिनीवर एम. एस. बॅण्डचे काम करणे. प्रभाग क्र. २३ मधील सुचेतानगर जलकुंभ येथे एअर व्हॉल्व्ह दुरुस्त करणे. प्रभाग क्र. १६ मधील गांधीनगर जलकुंभ येथे ७०० मी.मी. व्यासाचे दोन व्हॉल्व्ह दुरुस्त करणे. प्रभाग क्र. २१ मध्ये मुक्तिधाम जलकुंभाजवळील कुलकर्णी पंपाची ३०० मी.मी. व्यासाची एम. एस. पाइपलाइन दुरुस्ती, इनलेट लाइनवर व्हॉल्व्ह बसविणे, दुर्गा जलकुंभ येथील स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत इनलेट व आउटलेट लाइनवर व्हॉल्व्ह बसविणे, पेठ रोड सप्तरंग सोसायटीजवळ मखमलाबाद ६०० मी.मी. व्यासाच्या उर्ध्ववाहिनीवर अमृतगार्डन, तवली डोंगराला जाणा-या उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. पंचवटी जलशुद्धीकरण आवारातील नवीन १५ लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभांच्या मुख्यवितरण वाहिनीवर आर.पी. जलकुंभाच्या उर्ध्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणे. पंचवटी निलगिरी बाग जलशुद्धीकरण आवारातील २० लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभच्या मुख्यवितरण वाहिनीवर क्रॉस कनेक्शन करणे. प्रभाग क्र. २६ मधील अंबड लिंक रोड म्हसोबा मंदिरामागे ले रिगालिया बिल्डिंग रस्ता येथील ५०० मी.मी. व्यासाची पाइपलाइन टाकणे आदी कामे केली जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT