Crime News Pudhari
नाशिक

Nashik Crime News | नाशिकमध्ये दिवसाढवळ्या थरार! विल्होळीत तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime News | प्रकृती चिंताजनक : व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विल्होळी शिवारातील रिग रँड हॉटेल परिसरात सूरज कुमार मोहनलाल सोलंकी (जैन), ३८ या युवकावर अज्ञात महिला व पुरुषांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सूरज सोलंकी हा नानावली जुने नाशिक परिसरातील रहिवासी असून, तो विल्होळी येथील पेलिकन कंपनीत कार्यरत होता. मागील काही काळापासून तो घरीच होता.

दरम्यान, त्याचे कंपनीतील काही व्यक्तींशी आर्थिक व वैयक्तिक वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास सूरजकुमार फोनवर कोणाशीतरी वाद घालत रागाच्या भरात घराबाहेर पडला. त्यावेळी त्याची वहिनी मेघा गोपाल सोलंकी यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकून न घेता निघून गेला. त्यानंतर सुमारे तासाभराने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्ही मोबाइल बंद आढळले.

या हल्ल्यासंदर्भात त्याच्याच कंपनीतील एक पुरुष व महिलेवर या संदर्भात संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हल्ला सुरू असताना एका नागरिकाने दूरवरून त्याचा व्हिडिओ चित्रित करून समाजमाध्यमांवर प्रसारित केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सूरज सोलंकी यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान त्याला मधुमेहाचा गंभीर आजार असल्याचेही निदर्शनास आले असून, त्यामुळे शरीरावर इतर जखमा असल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले, पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांच्यासह शीतल गायकवाड, दत्तात्रय वाजे, मंगेश पानझडे, नीलेश मराठे व अनिल मुरडकर यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT