नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन रुग्णालयीन इमारतीचे काम करत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू ,झाल्याची घटना चांदशी शिवारात मंगळवारी (दि.३) घडली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आलामीन लाल मोहमंद शेख (२४) व आशिकुल शमशुद्दीन शेख (२१, दोघे रा. चांदशी शिवार, ता. नाशिक, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे दोघा कामगारांचे नाव आहे. मंगळवारी (दि.३) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. चांदशी शिवारात रुद्राक्ष रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. तेथे तिसऱ्या मजल्यावर स्लॅबचे काम सुरू आहे. या ठिकाणी आलामिन व आशिकुल शेख हे दोघे स्लॅबच्या सेट्रिंगचे काम करण्यासाठी एकाच लाकडी फळीवर उभे होते. मात्र, फळी तुटल्याने दोघेही तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यात दोघांनाही गंभीर मार लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :