Nashik Ring Road 
नाशिक

Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

Nashik Trimbakeshwar Road | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर कामे सुरू; वाहतूक कोंडीपासून मिळणार मुक्ती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग आला आहे. कुंभमेळ्याच्या पर्वकाळात देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने हा मार्ग अधिक प्रशस्त, सुरक्षित आणि गतिमान करण्यावर विशेष भर दिला आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि भाविकांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी वर्षभर भाविकांचा ओघ सुरू असतो. विशेषतः श्रावण महिना, शनिवार-रविवार आणि सणासुदीच्या सुट्ट्यांच्या काळात या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होते.

रस्ता अरुंद असल्याने अनेकदा या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

आगामी कुंभमेळ्यात साधू-महंत, आखाडे आणि कोट्यवधी भाविकांच्या शाहीस्नानासाठी व वाहतुकीसाठी हाच मार्ग मुख्य दुवा ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कुंभमेळ्यापूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
सध्या या संपूर्ण मार्गावर ठिकाणी रस्ता रुंदीकरण, भरव टाकणे, डांबरीकरण, साइडपट्ट्या मजबूत करणे आणि जुने पूल व मोऱ्यांच्या दुरुस्तीस विस्तारीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच रस्त्यालगतची अतिक्रमणे काढणे आणि वळणाच्या ठिकाणी रस्ता सरळ करणे यावरही विशेष भर दिला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT