temperature drop winter 
नाशिक

Nashik temperature drop winter|गुलाबी थंडीची चाहूल; तापमानात घट, नाशिकला १५, तर निफाडमध्ये १२.७ अंश सेल्सिअसची नोंद

गुलाबी थंडीची चाहूल; तापमानात घट, नाशिकला १५, तर निफाडमध्ये १२.७ अंश सेल्सिअसची नोंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अखेर गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, तापमानाचा पारा झपाट्याने घसरू लागला आहे. शनिवारी नाशिक शहराचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस, तर निफाडमध्ये १२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आगामी काळात थंडीचा प्रभाव वाढण्याचे संकेत मिळत आहेत. नाशिक शहराच्या तापमानात गेल्या सहा दिवसांत तब्बल सात अंशांची घसरण झाली आहे.

दिवाळीच्या सुरुवातीलाच वातावरणात लक्षणीय बदल जाणवू लागला आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिले. सप्टेंबरमध्येही नाशिकसह जिल्ह्यात पावसाने दडी मारली. त्यातच ऑक्टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता कायम राहिल्याने नागरिकांना सलग दोन महिने उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. मात्र, आता वातावरणात बदल होऊन किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिक शहराच्या तापमानात गेल्या सहा दिवसांत तब्बल सात अंशांची घसरण झाली आहे. सोमवारी किमान तापमान २२ अंश होते. त्यानंतर मंगळवारी १८.३, बुधवारी १८.२, गुरुवारी १८.४, शुक्रवारी १७.३, तर शनिवारी १५ अंशांपर्यंत तापमान खाली आले. विशेष म्हणजे अवघ्या २४ रब्बी हंगामासमोर आव्हान कायम यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, अपेक्षित थंडी पडण्याची शक्यताही कमी असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. पेरणीसाठी पोषक हवामान तयार होण्याची शक्यता कमी आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आणि चांगल्या प्रतीची जमीन आहे, त्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊनच रब्बीची पेरणी करावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्यामुळे थंडीची चाहूल लागली असली, तरी शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाची चिंता कायम आहे.

दरम्यान, यंदा मागील वर्षाप्रमाणे कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी असून, हलक्या स्वरूपाची थंडी जाणवेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. निफाडमध्येही तापमान ९ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, वातावरणात अचानक होणाऱ्या बदलांमुळे या अंदाजांतही काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT