Nashik Teacher's Constituency  file photo
नाशिक

Nashik Teacher's Constituency |कोटा पद्धतीमुळे कार्यकर्ते संभ्रमात

निवडणुकीत कोटा पद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१) सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीसाठी असलेले महसूल कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी आणि उमेदवार हे मतदान केंद्रावर सकाळीच उपस्थित झाले. कार्यकर्ते मात्र दुपारनंतर मतमोजणी केंद्रावर पोहोचले. मात्र, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीची कोटा पद्धत असल्याने या मतमोजणीला वेळ लागणार असल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निव़डणुकीच्या मतमोजणीमध्ये सोमवारी (दि.१) दुपारपर्यंत कल समजला होता. विधान परिषदेच्या मतमोजणीमध्ये चिठ्ठी पद्धत असल्याने वेळ लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाट बघावी लागली. कोटा निश्चित व्हायलाच रात्र उजाडणार असल्याने असलेल्या कार्यकर्त्यांनी जाऊन येऊन थांबणे पसंत केले आहे.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नाशिक विभागात ही लढत प्रामुख्याने महायुतीचे विद्यमान आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यामध्ये होताना दिसत आहे. मतमोजणी केंद्रावरील प्रतिनिधींनी सर्वप्रथम मतदान चिठ्ठ्या एकत्र करत ३० टेबलवर प्रत्येकी एक हजार अशा वाटप करून प्रत्येक उमेदवाराच्या रकान्यात ठेवण्यात आल्या तसेच बाद मतपत्रिकाही बाजूला करण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT