Nida Khan Arrested Pudhari
नाशिक

Nashik TCS Case | अखेर निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक; नगरसेवक मतीन पटेलचीही चौकशी

नाशिकमधील बलात्कार,धर्मांतर, ॲट्रॉसिटी गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या निदा खानला MIM नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Nida Khan Arrested

नाशिक: नाशिकमधील बलात्कार, धर्मांतर, ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सलग दोन दिवस ऑपरेशन राबवून आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातून ताब्यात घेतले.

नाशिक पोलिसांच्या SIT तपासामध्ये आरोपीस नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली. तसेच मतीन पटेल याचीही पोलिस पथकांकडून चौकशी करण्यात आली.

आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून नारेगाव परिसरात अत्यंत वेगवान व नियोजनबद्ध कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीस आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच नारेगावचे नगरसेवक मतीन पटेल यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, आरोपींना आश्रय देणारे व कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

नाशिक पोलीस, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करीत आहेत.
- संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT