Gold theft  (Pudhari File Photo)
नाशिक

Gold Jewellery, Cash Stolen | सिन्नरला 10 लाखांच्या रोकडसह 10 तोळे सोन्याचे दागिने लंपास

Gold Jewellery, Cash Stolen | मुक्तेश्वरनगर येथे भरदिवसा घरफोडी; १० लाखांच्या रोकडसह १० तोळे सोन्याचे दागिने लंपास

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील मुक्तेश्वरनगर परिसरात भरदिवसा बंद घर फोडून १० लाखांची रोकड रक्कम आणि १० तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १२ लाख २० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १७) घडली.

या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शीतल चतुर (३३, रा. शिर्डी रोड, सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ६.३० ते ७.१५ च्या दरम्यान घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने चतुर यांच्या घराचे कुलूप तोडून दोन बेडरूममधील कपाटांमध्ये ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड रक्कम तसेच सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच निफाड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, पोलिस निरीक्षक श्रीराम पवार तसेच पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रेमकुमार दांडेकर करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT