नाशिक :नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांमध्ये सध्या सुरू असलेली रस्त्यांवरील खोदकाम व डक्टिंग कामे ही सिंहस्थ कुंभमेळा २०२७साठी उभारल्या जाणाऱ्या ३८५ किमी ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा भाग आहेत. ज्यावर कुंभमेळ्यातील डिजिटल व्यवस्थापनाची संपूर्ण यंत्रणा उभी राहणार आहे. कुंभमेळा काळात कोट्यवधी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल यंत्रणांना हे नेटवर्क आधार देणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद आणि संप्रेषण प्रणाली यासाठी हे नेटवर्क महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख ठिकाणांना हे नेटवर्क जोडले जाणार असून, कुंभमेळ्यानंतरही शहराच्या दैनंदिन सेवांसाठी ते उपयुक्त राहणार आहे. या नाशिक मनपामार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये कामाचे आदेश देण्यात आले असून, डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे १७१ किमी डक्टिंग पूर्ण झाले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील हजारो सीसीटीव्ही कॅमेरे, सिंहस्थाचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गर्दी विश्लेषण प्रणाली, सार्वजनिक सूचना व आपत्कालीन संदेश यंत्रणा तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील एकात्मिक नियंत्रण कक्ष या सर्व प्रणाली या नेटवर्कवर कार्यरत
गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद आणि संप्रेषण प्रणाली यासाठी हे नेटवर्क महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख ठिकाणांना हे नेटवर्क जोडले जाणार असून, कुंभमेळ्यानंतरही शहराच्या दैनंदिन सेवांसाठी ते उपयुक्त राहणार आहे. या नाशिक मनपामार्फत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये कामाचे आदेश देण्यात आले असून, डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे १७१ किमी डक्टिंग पूर्ण झाले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील हजारो सीसीटीव्ही कॅमेरे, सिंहस्थाचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गर्दी विश्लेषण प्रणाली, सार्वजनिक सूचना व आपत्कालीन संदेश यंत्रणा तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील एकात्मिक नियंत्रण कक्ष या सर्व प्रणाली या नेटवर्कवर कार्यरत हे ऑप्टिकल फायबर नेटवर्क नाशिकसाठी दीर्घकालीन पायाभूत गुंतवणूक आहे.
कुंभमेळ्यादरम्यान आवश्यक प्रणालींना याचा आधार मिळेल आणि पुढील काळात शहराच्या सेवा सक्षम होतील. तसेच फायबर क्षमतेच्या भाडेतत्त्वावरील वापरातून उत्पन्न मिळून गुंतवणुकीची परतफेड होण्यास मदत होईल. - मनीषा खत्री, आयुक्त, मनपा २०२७ मोबाइल 66 सिंहस्थ २०२० मध्ये कोट्यवधी भाविक मोबाइल ाहिती सेवांवर अवलंबून असतील. त्या सर्व सेवा अखंडितपणे सुरू राहाव्यात यासाठी हे नेटवर्क उभारले जात आहे. शेखर सिंह, आयुक्त, सिंहस्थ प्राधिकरण राहतील.
हे ऑप्टिकल फायबर नेटवर्क नाशिकसाठी दीर्घकालीन पायाभूत गुंतवणूक आहे. कुंभमेळ्यादरम्यान आवश्यक प्रणालींना याचा आधार मिळेल आणि पुढील काळात शहराच्या सेवा सक्षम होतील. तसेच फायबर क्षमतेच्या भाडेतत्त्वावरील वापरातून उत्पन्न मिळून गुंतवणुकीची परतफेड होण्यास मदत होईल.
- मनीषा खत्री, आयुक्त, मनपा
सिंहस्थ २०२७ मध्ये कोट्यवधी भाविक मोबाइल माहिती सेवांवर अवलंबून असतील. त्या सर्व सेवा अखंडितपणे सुरू राहाव्यात यासाठी हे नेटवर्क उभारले जात आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, सिंहस्थ प्राधिकरण