नाशिक

नाशिक : चौक मंडईतील दुकानांना अचानक आग, लाखो रुपयांचे नुकसान

गणेश सोनवणे

जुने नाशिक : जूने नाशिक परसरातील चौक मंडई भागात (दि.९) रात्री साडे अकराच्या सुमारास दुकानांना अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे आढळून आले आहे.

अग्निशमक दलाला माहिती मिळताच शिंगाडा तलाव, पंचवटी, सातपूर व सिडको येथील एकूण सहा बंब घटनास्थळी पोचले. तसेच भद्रकाली पोलिसांनीही बंदोबस्त तैनात केले होते. मोठया प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्याने प्रशासनाला काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या शर्यतीचे प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT