Nashik Shirpur Ganja Seized : शिरपूर येथे एक कोटी रुपयांचा दोन हजार किलो गांजा जप्त  Pudhari News Network
नाशिक

Nashik Shirpur Ganja Seized : शिरपूर येथे एक कोटी रुपयांचा दोन हजार किलो गांजा जप्त

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स व धुळे पोलीस यांची संयुक्त कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शिरपूर तालुक्यातील जमान्यापाडा या गावात १ कोटी २ लाख रुपयांचा दोन हजार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक व धुळे जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त दलाने कारवाई सदर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना चार दिवस ३० तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपींची नावे अशी...

कालुसिंग गोंडा पावरा कृष्णा तारासिंग पावरा, हरबा कुवरसिंग पावरा, गोंडा नाना पावरा,गुलाब हाण्या पावरा, कांतीलाल गुलाब पावरा रमेश गुलाब पावरा सर्व राहणार शिरपूर जिल्हा धुळे ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

टास्क फोर्स पोलीस उपाधीक्षक गुलाबराव पाटील, यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,जामन्यापाणी गावात वनजमिनीवर मानवी मेंदुवर विपरीत परिणाम घडवुन आणणा-या गांजाच्या झाडांची (कॅनाबिस प्लांटची) अवैध रित्या लागवड करण्यात आली आहे. त्यावरुन अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस यांनी छापा टाकून संबंधित आरोपींना ताब्यात घेतले.

सदर आरोपी जमान्यापाडा, पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे वनजमिनीवर सामुहिकरित्या गांजा झाडांची (कॅनाबिस प्लांटची) अवैध रित्या लागवड करुन देखभाल व रखवाली करतांना मिळून आले.

त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करुन गांजाची काही झाडे कापुन व उपटुन त्यांचे प्रत्येकी ५० किलोग्रॅम वजनाचे २१ खड्डे बांधून एकुण १०५० किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरचे ठिकाण हे अतिदुर्गम वन परिसरात असल्याने सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास अपरात्र झाल्याने कारवाई थांबवण्यात आली होती. दि २७ नोव्हेंबर रोजी पंचनामा कारवाई पुन्हा सुरु करुन प्रत्येकी ५० किलोग्रॅम वजनाचे २० गड्ढे बांधुन १००० किलोग्रॅम वजनाची गांजा झाडे जप्त करण्यात आली. याप्रमाणे दोन दिवसात एकुण १ कोटी २ लाख ५० हजार २०५० किलोग्रॅम वजनाचा गांजा सदर कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याबाबत शिरपुर तालुका पोलीस ठाणे गुरनं. २९४/२०२५ एन डी पी एस अधिनियम १९८५ चे कलम 8 (ब) (क), २०(क), २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे नेमणुक अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स (कृती) नाशिक यांनी केला.

अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक, प्रविण पाटील, पोलीस अधीक्षक श्री. मकानदार, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक -भागवत व्यवहारे,माधवानंद धोतरे, उपनिरीक्षक संजय आदलिंग, हवालदार गणेश ढामले, राधेश्याम जंगलू पवार, प्रशांत सतिष देशमुख, वैभव रामदास पांढरे, भास्कर पांडु चव्हाण, दिनेश अशोक शिंदे, चेतन चंद्रकांत चव्हाण, स्वप्निल प्रल्हाद वारडे, किशोर बाळासाहेब बर्गे,अर्जन वसंतराव बंद्रे,असई अनिल मुरलीधर पास्ते, गणेश नंदकुमार मिसाळ,कालिचरन बिन्हाडे यांनी केली असुन धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,सुनिल वसावे, संतोष पाटील, सागर ठाकुर, चत्तरसिंग खसावद, संदीप ठाकरे,राजु ढिसले,अल्ताफ मिर्झा, गिरधर पाटील,प्रकाश भिल,संजय भोई,योगेश मोरे,स्वप्नील बांगर, भुषण पाटील, कृष्णा पावरा, इसरार फारुकी यांनी ही कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT