देवळा : येथील श्री संगमेश्वर महादेव मंदिरात 31 फुट उंचीचे त्रिशूल ,डमरू उभारण्यात आले . देवळा येथील कोलथी नदीकिनाऱ्यावर पुरातन महादेव मंदिर असून , याठिकाणी लोकवर्गणीतून गेल्या तीन वर्षांपूर्वी भव्य असे नवीन मंदिर बांधण्यात येऊन जीर्णोद्धार करण्यात आले आहे.
मंदिराच्या देवस्थान समितीच्या वतीने मंदिर वर्धापन दिन व महाशिवरात्री निमित्ताने शिव रामायण कथा व प्रवचनाचे आयोजन करण्यात येते. या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो . महाप्रसादने कथेचा समारोप करण्यात येतो.
पवित्र अशा श्रावण महिन्यात मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून , दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर या मंदिरात भव्य असे 31 फुट उंचीचे कायमस्वरूपी आकर्षक अशा त्रिशूल, डमरू उभारण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे . श्रावणात दर सोमवारी मंदिरात पूजेसाठी महिलांची रीघ लागते . तसेच दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते . याकामी हेमंत अहिरराव , शांताराम निकम , डॉ प्रकाश सोनवणे , दातात्रेय देवरे , सुदर्शन हेगडे , पवन अहिरराव , सुनील नेरकर , सुनील आहेर . केदारनाथ मेटकर , गौरव खैरणार आदींनी याकामी परिश्रम घेतेले.