रामसृष्टीत साकारलेले ७० फूटी प्रभु श्रीरामाचे शिल्प pudhari news network
नाशिक

Nashik Rambhumi | रामसृष्टीत साकारलेल्या ७० फूटी श्रीराम शिल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : श्रीराम प्रभूंचे शिल्प प्रत्येकाला धर्माच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. अयोध्या संस्कृतीचे तर रावणाची लंका विकृतीचे धडे देते. त्यामुळे संस्कृती महत्वाची असल्याचे मत इस्कॉन संस्थेचे वैश्विक समिती सदस्य गौरांग प्रभुजी यांनी व्यक्त केले.

आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रयत्नातून राम सृष्टी उद्यान, तपोवन येथे आकर्षक व राज्यातील सर्वात मोठे प्रभू श्रीरामांच्या ७० फूट उंचीचे शिल्पाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी ( दि. ११) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर, महंत रामकिशोर शास्त्री, महंत रामस्नेहीदास महाराज, महंत सुधीरदास पुजारी, महंत बालकदास महाराज, स्वामी श्रवनगिरी महाराज, अरूण गिरि महाराज, महंत भक्ती चरणदास महाराज, प्रजापिता ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी, पूनम दिदी, गोविंद दास महाराज, प्रवीणदास महाराज, संतोषदास उदासीन महाराज आदी उपस्थित होते.

तपोवन येथील रामसृष्टी उद्यान येथे उभारण्यात आलेले प्रभू श्रीरामाचे ७० फूट उंचीची मूर्ती

डॉ. गोविलकर म्हणाले, श्रीराम शिल्प हे अतिशय सुंदर अशी कल्पना साकार झालेली दिसते. प्रभू श्रीराम म्हणजे गुणाचे द्योतक आहे.

महंत रामकिशोरदास महाराज यांनीही मार्गदर्शन केले. धनंजय पुजारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास माजी महापौर रंजना भानसी, हेमंत शेट्टी, अरुण पवार, रुची कुंभारकर, प्रियंका माने, दिनकर आढाव, उद्धव निमसे, सरिता सोनवणे, सुरेश खेताडे, प्रा.शरद मोरे, सुनील केदार, शाम बडोदे, मुकेश शहाणे, प्रवीण भाटे , सौरभ सोनवणे, सोमनाथ बोडके, विशाल गोवर्धने, राहुल क्षीरसागर, नरेश पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

तपोवनात श्रीराम सृष्टी उद्यानात श्रीराम शिल्प लोकार्पण पंचवटीसाठी सुवर्ण क्षण आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सरकार येताच निधी मंजूर झाला. भारतातील रामसृष्टी उद्यान पर्यटक हब होणार आहे. राजकीय भूमिका व धार्मिक भूमिका वेगळी असते. दिंडोरी रोडवरील म्हसरूळ येथे ६०० खाटाचे वैद्यकीय महाविद्यालय होणार आहे.
ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT