नाशिक

नाशिक : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नैताळेत सरणावर उपोषणाची तयारी

गणेश सोनवणे

लासलगाव (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गेल्या बारा दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले आहेत. मात्र शासन त्यांच्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नाहीत ही बाब गंभीर असून त्यांच्या समर्थनार्थ नैताळे येथील मराठा शेतकरी वाल्मीक गंगाराम बोरगुडे यांनी उद्या (दि.10) पासून सरणावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबतचे निवेदन निफाड पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे. दरम्यान चार वाजता सरण रचन्यासाठी लाकूड व गौरी गोळा करण्यासाठी गावातील मराठा तरुण घरोघरी जाऊन एक एक लाकूड व एक गौरी गोळा करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नैताळे येथे सरणावर उपोषण केले जाणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील मराठा तरुणांनी यासाठी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या (दि. १०) सकाळी ८ वाजता नैताळे ग्रामपंचायत समोर उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र बोरगुडे यांनी केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT